सातारा : अजिंक्यतारा कारखान्याकडून १०० टक्क एफआरपी अदा, शेतकऱ्यांना मिळाले २१३ कोटी रुपये

सातारा : अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे कामकाज सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्धरीत्या सुरू आहे. कारखान्याने ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना उच्चतम दर देण्याची परंपरा कारखान्याने कायम जोपासली आहे. गळीत हंगाम २०२५-२६ची सुरुवात तीन नोव्हेंबर २०२५ ला सुरू झाला. त्याची सांगता २६ फेब्रुवारीला झाला. गाळपास येणाऱ्या उसाला १५ दिवसांच्या आत पेमेंट करणारा कारखाना अशी ख्याती असलेल्या कारखान्याने चालू गळीत हंगामात गाळप झालेल्या उसाची संपूर्ण रक्कम २१३ कोटी ५० लाख रुपये संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष यशवंत साळुंखे यांनी दिली.

साळुंखे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कारखान्यात या गळीत हंगामात सहा लाख दहा हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून, १२.७४ साखर उताऱ्याने सहा लाख ९६ हजार ६१७ एवढ्या साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे.उसाला प्रतिटन ३५०० रुपये दर दिला असून, गाळप झालेल्या एकूण उसाचे होणारे संपूर्ण बिल रक्कम रुपये २१३ कोटी ५० लाख संबंधित ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here