पुणे : हर्णेश्वर साखर कारखान्यातील आर्थिक व्यवहारांची साखर आयुक्त करणार चौकशी

पुणे : इंदापूर (जि. पुणे) तालुक्यातील हर्णेश्वर साखर कारखान्यातील आर्थिक व्यवहारासंदर्भात चौकशी करण्याची मागणी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व इंदापूर तालुका भाजप अध्यक्ष, कडबनवाडी येथील ज्ञानदेव (माऊली) हरिभाऊ चवरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे १५ एप्रिल २०२५ रोजी पत्राद्वारे केली होती. हर्णेश्वर साखर कारखान्यातील घोटाळ्याची मागणी करुन लिक्विडेटर जिगर प्रदीपचंद शहा यांच्यावर त्वरीत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आता या कारखान्याच्या चौकशीसाठी साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

आगामी एक महिन्यात या समितीला हर्णेश्वर साखर कारखान्यात्तील आर्थिक व्यवहारासंदर्भात चौकशी करुन याबाबतचा अहवाल शासनास सादर करण्याची मुदत दिली आहे. साखर आयुक्त हे याचे अध्यक्ष असून प्रादेशिक सहसंचालक हे सदस्य सचिव आहेत. समितीत सदस्य म्हणून उपविभागीय अधिकारी बारामती, उपविभाग, बारामती, सह जिल्हा निबंधक, पुणे, विभागीय उपनिबंधक, इंदापूर, जिल्हा उपनिबंधक, पुणे आणि बारामतीच्या पोलिस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here