सांगली : हुतात्मा कारखान्याच्या अध्यक्षांचे अधिकार आता उपाध्यक्ष भाडळकर यांच्याकडे, संचालकांचा निर्णय

सांगली : हुतात्मा साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी तातडीने राजीनामा द्यावा, या मागणीसाठी गेल्या १७ दिवसांपासून कारखान्यासमोर सभासद व शेतकरी ठिय्या आंदोलन करत आहेत. आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा गौरव नायकवडी यांनी दिला आहे. कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांचे सर्व अधिकार संचालक मंडळाच्या ठरावाद्वारे काढून घेण्यात आले असून ते उपाध्यक्ष रामचंद्र भाडळकर यांना देण्यात आले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. आता उद्यापासून १५ गावांत अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी सह्यांची मोहीम राबविण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.

यावेळी गौरव नायकवडी म्हणाले की, संचालकही मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत. अध्यक्षांनी सभासदांचा विचार न करता कारखान्यावर प्रचंड कर्जाचा बोजा टाकला आहे. भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना जाणीवपूर्वक रोजगारापासून दूर ठेवण्यात आले. केदार नायकवडी यांनी साखर चोरीसंदर्भात गंभीर आरोप करत संबंधित प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी केली. राजू मुळीक यांनी वैभव नायकवडी यांनी सर्वांसमोर येऊन आपली बाजू मांडावी, असे सांगितले. यावेळी एच. पाटील (येडे निपाणी), अधिक डवंग, केदार नायकवडी यांची भाषणे झाली.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here