अहिल्यानगर : ऊस वाहतुकीबाबत खोटा धनादेश देणाऱ्या कंत्राटदारास कारावास; बारा लाखांचा दंड

अहिल्यानगर : शिंगणापूर येथील अमृत संजीवनी शुगरकेन संस्थेस खोटा धनादेश दिल्या प्रकरणी कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी संजय खैरनार यांनी ऊसतोड वाहतूक कंत्राटदार भगवान दत्तू हिवर्डे (रा. खिर्डी, ता. खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर) याला एक वर्ष कारावास व १२ लाख ३० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. कंत्राटदार भगवान हिवर्डे याने २०१९-२० च्या गाळप हंगामात अमृत संजीवनी शुगरकेन संस्थेकडे ऊसतोड वाहतुकीचा करारनामा करून त्यापोटी उचल रक्कम उचलली होती. मात्र कराराचे पालन केले नव्हते. कंपनीकडून विचारणा केल्यावर थकीत रकमेपोटी कंपनीला खोटा धनादेश दिला होता.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याकरिता शिंगणापूर येथील अमृत संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट कंपनी काम करते. या कंपनीच्यावतीने ऊसतोड व वाहतूक केली जाते. या कंपनीची भगवान हिवर्डे याने फसवणूक केली. त्यामुळे कंपनीच्यावतीने विजय पंढरीनाथ नरोडे यांनी येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्टात फौजदारी खटला दाखल केला होता. त्याची न्यायमूर्ती संजय खैरनार यांच्यासमोर सुनावणी झाली. संशयिताने खोटा धनादेश देऊन कंपनीची फसवणूक केली असा आक्षेप होता. याबाबत न्यायामूर्तींनी हिवर्डे याला एक वर्ष कारावास व १२ लाख ३० हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. संस्थेच्या वतीने ॲड. अशोकराव दुपके यांनी कामकाज पाहिले. त्यांना ॲड. माधुरी काटे यांनी सहकार्य केले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here