एफआरपीसाठी त्या वर्षीचा साखर उताराच ग्राह्य धरावा; खांडसरी, गूळ उद्योगही कायद्याच्या कक्षेत आणावेत : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

पुणे : केंद्र सरकारने प्रस्तावित ऊस नियंत्रण आदेश २०२६ अंतर्गत सुधारणा करताना देश पातळीवर प्रतिदिन १०० मे. टनांइतक्या क्षमतेचे खांडसरी उद्योगासह गूळ उत्पादन, गूळ पावडर उत्पादकांनाही कायद्याच्या कक्षेत आणावे यासह ज्या वर्षीची एफआरपी त्याच वर्षीचा साखर उतारा विचारात घेण्यात यावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी केंद्र सरकारकडे साखर उद्योगाच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुण्यात शनिवारी (दि. १६) महासंघाची बैठक झाली. ५५ ते ६० कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीस माजी सहकारमंत्री व ‘व्हीएसआय’चे उपाध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील, जयप्रकाश दांडेगावकर, राजेश टोपे, बाळासाहेव पाटील, पृथ्वीराज जाचक, महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांच्यासह कर्नाटक, गुजरात आणि उत्तर प्रदेशमधील प्रतिनिधीही उपस्थित होते. त्यानंतर सायंकाळी पत्रकार परिषदेत झालेल्या निर्णयांची माहिती त्यांनी दिली.

ChiniMandi WhatsApp Channel

राज्यातील ऊस गाळप हंगामाचे दिवस ८५ ते ९० दिवसांपर्यंत खाली आले असून, गुऱ्हाळघरांकडूनही प्रतिदिन पाचशे टनांइतके ऊस गाळप केले जाते. शेवटी ऊस उत्पादक शेतकरी केंद्रबिंद मानूनच धोरणात्मक निर्णय व्हायला हवेत. केंद्राने प्रस्तावित कायदा बदलावर २० मेपूर्वी सूचना-हरकती मागवल्या असून, आम्ही आजच्या बैठकीतील निर्णयानुसार निवेदन देणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

प्रस्तावित कायद्यात अपेक्षित बदलाची पुढीलप्रमाणे मागणी…

उसाची एफआरपी उशिराने दिल्यास व्याजाचा दर हा १२ टक्के असावा.

दोन साखर कारखान्यांमधील हवाई अंतराची अट २५ किलोमीटर ठेवावी.

साखरेचा आणि इथेनॉलचा दर हा उसाच्या एफआरपीशी निगडीत ठेवावा.

साखरेसाठी द्विस्तरीय किंमत धोरण हवे. ग्राहकांसाठी एक आणि व्यापारी वापरासाठी स्वतंत्र दर असावेत.

साखर उद्योगाचा कोणताही निर्णय हा या क्षेत्रात अग्रणी असलेल्या शिखर संस्थांशी विचारविनिमय करून घ्यावा.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here