सांगली : राजारामबापू कारखान्याच्या साखराळे युनिटच्या आधुनिकीकरणाचे काम ३० ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या युनिटमध्ये यापूर्वी प्रतिदिन ७,००० टन ऊस गाळप केले जात होते. आगामी गळीत हंगामाच प्रतिदिन १० हजार ५०० टन ऊस गाळप करण्यात येईल, असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी व्यक्त केला. या युनिटमधील मिल रोलर पूजनप्रसंगी ते बोलत होते. कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक विजय मोरे यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले.
अध्यक्ष प्रतिक पाटील यांनी सांगितले की, कारखान्याच्या चारही युनिटमध्ये येत्या हंगामासाठी पुरेशा उसाची नोंद आहे. साखराळे युनिटसाठी ४०० ट्रॅक्टर, ४०० अंगद, ६०० बैलगाड्या तसेच २० हार्वेस्टर मशीनचे करार पूर्ण करण्यात आले आहेत. यावेळी कारखान्याचे संचालक बाळासाहेब पवार, प्रदीप पाटील, कार्तिक पाटील, अतुल पाटील, विठ्ठल पाटील, शैलेश पाटील, प्रताप पाटील, दादासाहेब मोरे, अमरसिंह साळुंखे, रमेश हाके, रघुनाथ जाधव, राजकुमार कांबळे, दिलीपराव देसाई, प्रा. डॉ. योजना शिंदे-पाटील, दीपक पाटील, रामराव पाटील, वैभव रकटे उपस्थित होते. विजय मोरे यांनी स्वागत केले. मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील यांनी आभार मानले.


















