पुणे : श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याने जपली सामाजिक बांधीलकी, सहा वर्षाच्या मेहनतीतून वृक्षसंपदा बहरली

पुणे: श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांनी फक्त वृक्षारोपणाबरोबर गोशाळा, जीजी- आण्णा पार्क, करोना काळात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना मदत करणे, आदी सामाजिक बांधिलकी असलेल्या योजना प्रत्यक्षात आणल्या आहेत. आज कारखाना परिसरात वृक्षसंपदा जपली आहे. या उपक्रमात अध्यक्ष पांडुरंग राऊत आणि संचालक मंडळ, प्रशासनाचा मोठा वाटा आहे. कारखान्याने सामाजिक बांधीलकी जपत टाकळी फाटा ते मेमाणे वस्ती (टाकळी भीमा) रस्त्याकडेला लावलेली वृक्षसंपदा आता बहरली आहे. हेच पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने टाकलेले विधायक पाऊल आहे.

पाटेठाण येथील कारखान्याने व्यवसायाबरोबरच वृक्ष संवर्धनाची योजना जपली आहे. राहू बेट परिसरात खासगी स्वरूपातील म्हस्कोबा कारखान्याने एक आदर्श निर्माण केला आहे. प्रशासनाने यासाठी कामगारांची नेमणूक करून ती जोपासण्याचा प्रयत्न पहिल्या दिवसांपासून केला आहे. उन्हाळ्यात कारखान्याने झाडांना पाणी देण्यासाठी एक ट्रॅक्टर व दोन कामगारांची नेमणूक केली आहे. त्यामळे रोपण केलेल्या झाडांपैकी बरीच झाडे बहरली आहेत. टाकळी फाटा ते मेमाणे वस्ती (टाकळी भीमा) यामध्ये रस्त्याच्या कडेला हिरवाई दिसून येत आहे. २०२० पासून झाडांची देखभाल केली जाते. आता रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्द सावली पडत आहे. त्यामुळे प्रवासी आणि नागरिक, कारखान्याचे सभासद हे क्षणभर विश्रांती घेतल्याशिवाय पुढे जात नाही.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here