सांगली : केन ॲग्रोकडून सांगली जिल्हा बँकेत ३२.५० कोटी जमा, कर्ज वसुलीने बँकेला दिलासा

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मागील संचालक मंडळाच्या काळात केन ॲग्रो एनर्जी (इंडिया) लिमिटेड कारखान्याला मोठ्या प्रमाणावर कर्जपुरवठा केला होता. मार्च २०२२ अखेर या कारखान्याकडे व्याजासह तब्बल २२५.५५ कोटी रुपयांची थकबाकी होती. ही थकबाकी टप्प्याटप्प्याने भरली जात आहे. आता कारखान्याने थकीत कर्जापैकी आणखी १६ कोटी ५० लाख रुपये जमा केले आहेत. मार्च २०२६ अखेर कारखान्याकडून ४५ कोटी रुपये भरणे अपेक्षित होते. त्यापैकी आतापर्यंत एकूण ३२.५० कोटी रुपयांची रक्कम बँकेत जमा झाली आहे.

थकीत कर्ज वसुलीसाठी बँक आणि कारखाना प्रशासनाच्या सहमतीने कर्जवसुलीसाठी सात वर्षांचा ॲक्शन प्लॅन मंजूर केला आहे. या योजनेनुसार कारखान्याने पुढील सात वर्षांत टप्प्याटप्प्याने संपूर्ण थकीत कर्जाची परतफेड करायची आहे. कारखान्याने थकीत कर्जाची मोठी रक्कम जमा झाल्यामुळे जिल्हा बँक प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबत बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक म्हणाले की, केन अॅग्रो कंपनीकडे जिल्हा बँकेची सुमारे २२५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. राष्ट्रीय कंपनी लवादाने मंजूर केलेल्या सात वर्षांच्या अॅक्शन प्लॅननुसार कंपनीकडून नियमित हप्त्यांमध्ये परतफेड सुरू आहे. यापूर्वी कारखान्याने दोन टप्प्यांत भरून १८.८३ कोटी रुपये जिल्हा बँकेत जमा केले होते. तर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ म्हणाले की, मार्च २०२६ अखेरच्या एकूण भरणा रकमेपैकी ३२.५० कोटी रुपये कारखान्याने भरले आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here