सांगली : भारती शुगर्स अँड फ्युएल्स प्रा. लि; नागेवाडी कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन भारती विद्यापीठाचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र लाड यांच्या हस्ते व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक महेंद्र लाड, भारती शुगर्सचे चेअरमन, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ऋषिकेश लाड, युवा उद्योजक रोहन लाड यांच्या उपस्थितीत झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी आर. डी. पाटील यांच्याहस्ते यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. संपतराव (नाना) माने यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. स्व. पतंगराव कदम व स्व. भारतीताई लाड यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उसाच्या नोंदी करण्याचे आवाहन यावेळी महेंद्र लाड यांनी केले.
यावेळी श्रीपती शुगरचे जनरल महेश जोशी, टेक्निकल मॅनेजर व्ही. पी. सूर्यवंशी, फायनान्स मॅनेजर पी. पी. पाटील, शेती अधिकारी एस. जे. मोहिते, डेप्यु. चिफ इंजिनिअर एच. एन. जाधव, श्रीपती शुगर्सचे फायनान्स मॅनेजर एस. डी. जगताप, कृष्णा वेरळा सूतगिरणीचे जनरल मॅनेजर ए. डी. दिवटे, टी. जी. शुगरचे महावीर मुथा, एस. के. खारगे, वाजे कन्स्ट्रक्शन्सचे व्ही. डी. वाजे, घानवडचे सरपंच प्रवीण रावताळे, बांबवडेचे उपसरपंच सतीश गायकवाड, प्रगतशील ऊसउत्पादक शेतकरी मनोज भंडारे, दिलीप भाड, शिवाजी निकम, बबन निकम, ऊसतोडणी वाहतूकदार शंकर काटकर, प्रमोद जगताप, मारुती माने, संजय इंगळे, नानासो जानकर, महिपती गीते, अश्रूबा सानप आणि त्याचबरोबर कारखान्याचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.


















