भारतातील कृषी आणि जल तंत्रज्ञान स्टार्टअप्सना नवी गती, शाश्वत विकासावर विशेष भर : नॅसकॉम

नवी दिल्ली : भारतातील कृषी (अॅग्रीटेक) आणि जल तंत्रज्ञान (वॉटरटेक) क्षेत्रातील डीपटेक स्टार्टअप परिसंस्था वेगाने विकसित होत असून या क्षेत्रातील नवकल्पनांच्या व्यावसायिकीकरणाला आणि व्यापक अंमलबजावणीला चालना मिळत आहे, असे नॅसकॉम यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.कृषी आणि जल क्षेत्रे सध्या महत्त्वाच्या टप्प्यावर असून अनेक स्टार्टअप्सना त्यांच्या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्यासाठी विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर ‘नॅसकॉम’ने नवी दिल्ली येथे Deeptech Confluence 2026: Agri and Water Tech या परिषदेतून या क्षेत्रांना गती देण्याचा उपक्रम हाती घेतला.

या परिषदेत डीपटेक स्टार्टअप्स, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, गुंतवणूकदार, सरकारी प्रतिनिधी, CSR संस्था, अंमलबजावणी भागीदार, संशोधन संस्था आणि नवउद्योग परिसंस्थेतील विविध घटक सहभागी झाले होते. कृषी आणि जल तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीय स्टार्टअप्ससाठी व्यावसायिकीकरण आणि अंमलबजावणीच्या संधींवर यावेळी चर्चा करण्यात आली. ‘नॅसकॉम’च्या Deeptech Club अंतर्गत चालणाऱ्या 20 आठवड्यांच्या DTC Accelerate कार्यक्रमाचा भाग असलेल्या 12 नाविन्यपूर्ण कृषी आणि जल तंत्रज्ञान स्टार्टअप्सनी आपल्या तंत्रज्ञानाचे सादरीकरण केले.यावेळी बाजारपेठेतील प्रवेश, उद्योगांकडून तंत्रज्ञानाचा स्वीकार, पायलट प्रकल्पांपासून मोठ्या प्रमाणावर विस्तार, गुंतवणुकीची तयारी आणि विविध क्षेत्रांतील सहकार्य यासंदर्भात चर्चा झाली.

ChiniMandi WhatsApp Channel

कृषी क्षेत्रासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर भर…

‘नॅसकॉम’च्या मते, भारतातील कृषी आणि जल क्षेत्रावर हवामान बदल, नैसर्गिक संसाधनांवरील ताण, शाश्वत विकासाची गरज आणि उत्पादकता वाढविण्याचे आव्हान आहे. त्यामुळे या क्षेत्रांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.जरी अॅग्रीटेक आणि वॉटरटेक क्षेत्रात नवकल्पनांचा वेग वाढला असला तरी अनेक स्टार्टअप्सना प्रारंभीच्या यशस्वी प्रकल्पांनंतर मोठ्या प्रमाणावर विस्तार साधता येत नाही. ही दरी भरून काढण्यासाठी नॅसकॉम स्टार्टअप्सना उद्योग, गुंतवणूकदार, धोरणकर्ते आणि अंमलबजावणी संस्थांशी जोडण्याचे काम करत आहे.

एआय, स्मार्ट शेती आणि जल व्यवस्थापनावर लक्ष…

परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित जल व्यवस्थापन, प्रिसिजन फार्मिंग (अचूक शेती), मृदा आरोग्य विश्लेषण, जैव उत्पादन, पाणी गुणवत्ता परीक्षण, सांडपाणी व्यवस्थापन, नैसर्गिक जलस्रोत पुनरुज्जीवन, शाश्वत साहित्य, मत्स्यपालन, शेती उत्पादनांची ट्रेसिबिलिटी आणि संसाधन कार्यक्षमता यांसारख्या तंत्रज्ञानांचे सादरीकरण करण्यात आले.संगीता गुप्ता म्हणाल्या की, कृषी आणि जल ही अशी क्षेत्रे आहेत जिथे डीपटेक तंत्रज्ञान आर्थिक, पर्यावरणीय आणि सामाजिक पातळीवर मोठा बदल घडवू शकते. भारतात अनेक उद्योजक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), जैवतंत्रज्ञान, सेन्सर तंत्रज्ञान, ऑटोमेशन आणि हवामान तंत्रज्ञान यांचा वापर करून नाविन्यपूर्ण उपाय विकसित करत आहेत. डीपटेक कॉन्फ्लुएन्सच्या माध्यमातून नॅसकॉम या स्टार्टअप्सना बाजारपेठ, उद्योग क्षेत्र आणि अंमलबजावणीच्या संधींशी जोडण्याचे काम करत आहे, असेही त्यांनी सांगितले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here