पुणे : विघ्नहर कारखान्याचा पुढाकार, ऊस लागवडीत शेतकऱ्यांनी केला आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार

पुणे : विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या शेती विभागाच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे ऊस लागवडीला नवी दिशा मिळू लागली आहे. आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि नियोजनबद्ध शेती पद्धतीमुळे परिसरातील शेतकरी अधिक आत्मविश्वासाने ऊस लागवडीकडे वळताना दिसत आहेत. जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार येथील शेतकरी गणेश अभिनंद पोटे यांनी आधुनिक पद्धतीने ऊस लागवड केली आहे. लागवडीनंतर अवघ्या दोन महिन्यांत पिकाची जोमदार वाढ झाली आहे.ऊस हे महत्त्वाचे नगदी पीक असून योग्य नियोजन, वैज्ञानिक शेती पद्धती आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाल्यास उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढू शकते. यासाठी कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी आणि संचालक मंडळ सातत्याने शेतकऱ्यांच्या संपर्कात राहून तांत्रिक मार्गदर्शन करत असल्याने ऊस उत्पादकांचा कारखान्यावरील विश्वास अधिक दृढ होत आहे.

याबाबत शेतकरी गणेश पोटे यांनी सांगितले की, ऊस लागवडीपूर्वी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या ऊस लागवड आत्मविश्वासाने करता आली. वेळोवेळी मिळालेल्या तांत्रिक सल्ल्यामुळे पिकाची वाढ अत्यंत समाधानकारक झाली असून भविष्यातही असेच सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा आहे. पोटे यांच्या शेतात कारखान्याच्या शेती विभागातील अधिकारी व तज्ज्ञांनी शेताची पाहणी करून जमिनीचा प्रकार, सुधारित ऊस वाणांची निवड, वैज्ञानिक लागवड पद्धती, खत व्यवस्थापन, सिंचन नियोजन तसेच रोग व कीड नियंत्रणाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या सर्व सूचनांचे काटेकोर पालन केल्यामुळे ऊस पिकाची वाढ समाधानकारक झाल्याचे दिसून येत आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here