अहिल्यानगर : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वतीने राजुरी गट क्र. ६ अ अंतर्गत बाभळेश्वर येथे विलास कारभारी म्हस्के यांच्या वस्तीवर हुमणी किड नियंत्रण व मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. यावेळी बाभळेश्वर येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ शैलेश देशमुख यांनी हुमणी किडीचा जीवनक्रम, पिकांवरील होणारे नुकसान तसेच नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली. हुमणी किड नियंत्रणासाठीप्रकाश सापळे व सौर ऊर्जेवरील प्रकाश सापळे शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास प्रवरा साखर कारखान्याचे माजी चेअरमन तुकाराम बेंद्रे, माजी संचालक डॉ. सोमनाथ गोरे, माजी संचालक अण्णासाहेब बेंद्रे, माजी कामगार संचालक लहानू चेचरे, अण्णासाहेब चेचरे, बापूसाहेब बेंद्रे, मुख्य शेतकी अधिकारी संजय मोरे, ऊस विकास अधिकारी श्री. देवकर, शेतकी अधिकारी घनश्याम कोळसे, ओव्हरशियर सर्वेश लोंढे व गिरीश मुसळे प्रमुख उपस्थित होते. प्रास्ताविक सतीश खोसे यांनी केले. आभार शेतकी अधिकारी घनश्याम कोळसे यांनी मानले.


















