अहिल्यानगर : पावसाअभावी बोधेगाव परिसरातील १६०० हेक्टरमधील ऊस पिक धोक्यात, दुष्काळाचे सावट

अहिल्यानगर : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसरात यंदा उन्हाळ्यात वाढलेल्या तीव्र स्वरूपाच्या तापमानामुळे जलसाठ्यांवर मोठा ताण पडला आहे. विहिरी, कूपनलिका आदी स्त्रोतांची पाणीपातळी खालावली आहे. अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या खर्चाने ऊसलागवड केली; परंतु आता पिकाच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पाणी उपलब्ध होत नसल्याने उसाची वाढ खुंटली आहे. काही ठिकाणी उसाची पाने वाळू लागली आहेत. पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादनातही मोठी घट होण्याची भीती निर्माण झाली आहे. दुष्काळाच्या सावटाने बोधेगावसह बालमटाकळी, सुकळी, शेकटे, बाडगव्हाण, नागलवाडी, लाडजळगाव, हातगाव, कांबी, मुंगी, शिंगोरी, पिंगेवाडी, प्रभूवाडगाव, गोळेगाव, सोनविहीर, अधोडी, दिवटे आदी गावांसह २६ गावांतील सुमारे साधारण १,५९७ हेक्टरहून अधिक क्षेत्रातील ऊस पिक धोक्यात आले आहे.

राज्यात १५ जूनपासून मान्सून सक्रिय होणार असल्याचे सांगितले जाते; परंतु पावसाळा लांबल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. बोधेगाव कृषी मंडळात तीव्र पाणीटंचाईची स्थिती आहे. त्याचा मोठा फटका ऊस पिकाला बसत आहे. विहिरी, बोअरवेल आणि अन्य जलस्रोत कोरडे पडू लागले आहेत. परिणामी ऊस पिकाच्या कांड्यांचा आकार कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. कृषी विभागाने पाण्याचा शेतकऱ्यांना उपलब्ध काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले असून, ठिबक सिंचनासारख्या पाणी बचतीच्या तंत्रांचा अवलंब करण्याचा सल्ला दिला आहे. ऊस उत्पादक संदीप ढेसले यांनी सांगितले की, त्यांचा पाण्याअभावी जवळपास दोन-अडीच एकर ऊस करपला आहे. मोठ्या अपेक्षेने ऊस लागवड केली होती. मात्र, आता पाण्याअभावी पीक वाचविणे कठीण झाले आहे. शासनाने तातडीने उपाययोजना करून शेतकऱ्यांना मदत करावी.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here