लातूर : लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. वसतिगृहांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांनी ३० जून पर्यंत अर्ज करणे आवश्यक असून त्यांची प्रवेश प्रक्रिया ७ जुलै रोजी अंतिम केली जाईल, तर इयत्ता ११ वी, १२ वी आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनी १५ जुलै पर्यंत अर्ज करावयाचे असून त्यांची प्रवेश प्रक्रिया ३१ जुलै रोजी अंतिम करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या योजनेतून जिल्ह्यातील रेणापूर आणि जळकोट तालुक्यांमध्ये प्रत्येकी मुलांचे एक व मुलींचे एक अशी चार शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत.
वसतिगृहांच्या प्रवेश प्रक्रियेत ऊसतोड कामगारांच्या मुला-मुर्तीसाठी ९० टक्के, ऊसतोड कामगारांचे पाल्य असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५ टक्के, ऊसतोड कामगार असलेल्या विधवा, परित्यक्ता व एकल पालक यांच्या पाल्यांकरिता ३ टक्के, तर ज्यांचे मृत्यू झालेले पालक ऊसतोड कामगार होते, अशा अनाथ पाल्यांसाठी २ टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत शैक्षणिक साहित्य, स्टेशनरी, एका वेळेचा सकस नाश्ता आणि दोन वेळचे भोजन यांसह विविध शैक्षणिक सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवर्गनिहाय अर्ज करावे लागणार आहेत. ऊसतोडणी कामगारांच्या पाल्यांनी त्वरित योजनेचा लाभ घ्यावा, प्रवेशासाठी संबंधित वसतिगृहांचे गृहपाल तसे सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय यांच्याशी संपव साधावा, असे आवाहन सहायक आयुक यादव गायकवाड यांनी केले आहे.


















