बीड : ऊसतोड कामगारांची मुले डॉक्टर, अभियंता, शिक्षक, पोलीस अधिकारी आणि उद्योजक बनावीत, हे सरकारचे स्वप्न आहे. त्यासाठीच संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहाची सुविधा दिली जात आहे. संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह हे ऊसतोड कामगारांच्या कुटुंबांना गरिबी आणि हंगामी स्थलांतराचे दुष्टचक्र भेदण्यास तसेच उज्ज्वल भविष्याचा मार्ग मोकळा करण्यास मदत करेल, असे प्रतिपादन राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले.
शुक्रवारी ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी असलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, ऊसतोड कामगारांचे वर्णन राज्याच्या अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक असे करत, त्यांच्या कष्टांमुळे आणि योगदानामुळेच साखर उद्योग सुरू राहतो. या पालकांना कामासाठी स्थलांतर करावे लागते. त्यामुळे ऊसतोड कामगारांच्या मुलांना त्यांचे शिक्षण अर्धवट सोडावे लागू नये याची दक्षता सरकार घेत आहे. हे वसतिगृह अशा विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात टिकून राहण्यास मदत करेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.


















