नांदेड : स्थलांतरित ऊसतोड मजुरांना फडावरच प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, त्यांचे आरोग्य अधिक सुरक्षित राहावे, यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने ‘आरोग्य साथी’ प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून स्वयंसेवकांना प्रथमोपचार, आरोग्य जनजागृती आणि गरज पडल्यास रुग्णांना आरोग्य केंद्रात रेफर करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. जिल्ह्यातील हजारो मजूर दरवर्षी कुटुंबासह ऊसतोडीसाठी स्थलांतर करतात. त्यांना स्थलांतराच्या काळात आरोग्य सेवा सहज उपलब्ध व्हावी, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने ‘आरोग्य साथी’ उपक्रम हाती घेतला आहे. त्याअंतर्गत नुकतेच नांदेड येथे प्रशिक्षण पुस्तिकेच्या आधारे प्रशिक्षण शिबिर पार पडले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्हा
परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा आरोग्य विभागाने केले होते. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सलमा हिराणी यांनी मार्गदर्शन करताना स्थलांतरित मजुरांमध्ये आढळणारे आजार, नांदेड प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालेले आरोग्य स्वयंसेवक. (दुसऱ्या छायाचित्रात) पुस्तिकेच्या आधारे शिबिरात माहिती देण्यात आली. महिला व बालकांचे आरोग्य, कुपोषण, तसेच फडावरच द्यावयाचे प्राथमिक उपचार याविषयी माहिती दिली. प्रशिक्षणात पब्लिक हेल्थ नर्स श्रीमती बेरलीकर आणि हेल्थ असिस्टंट रफिक शेख यांनी तांत्रिक व प्रात्यक्षिक मार्गदर्शन केले. हदगाव, मुखेड आणि तुपा परिसरातील आरोग्य स्वयंसेवकांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला होता. या उपक्रमामुळे स्थलांतरित ऊसतोड मजुरांना वेळेवर प्राथमिक आरोग्य सेवा मिळण्यास मदत होईल आणि त्यांच्या आरोग्य सुविधेत लक्षणीय सुधारणा होईल, असा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला.


















