अहिल्यानगर : ओंकार शुगरच्या युनिट 7 मध्ये मिल रोलर पूजन संपन्न

अहिल्यानगर : आगामी 2026-27 गाळप हंगामाची तयारी सुरू करत ओंकार शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडच्या युनिट क्रमांक 7 येथे मंगळवारी मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.हा पूजन सोहळा ओंकार शुगर समूहाचे अध्यक्ष बाबुराव बोत्रे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. समूहाचे संचालक प्रशांत बोत्रे-पाटील यांच्या हस्ते विधिवत मिल रोलर पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला संचालक अतुल जाधव, राजापूरचे माजी सरपंच सचिन (दादा) चौधरी, कारखान्याचे महाव्यवस्थापक स्वप्नील गावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

उपस्थितांनी आगामी गाळप हंगाम वेळेत सुरू होऊन तो यशस्वीपणे पार पडावा, तसेच त्यातून ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखान्याची अधिक प्रगती व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी कारखान्याचे वर्क्स मॅनेजर शशिकांत बडवे, मुख्य रसायनतज्ज्ञ गोपीनाथ पवार, मुख्य लेखाधिकारी सुनील राऊत, मानव संसाधन व्यवस्थापक रोहित बांकर, ईडीपी व्यवस्थापक मनीषकुमार मोरे, ऊस विकास अधिकारी माऊली नाना पाचपुते, सिव्हिल पर्यवेक्षक अनिल बांकर, स्टोअरकीपर गेनबा कदम, विद्युत व्यवस्थापक बाळासाहेब जोध तसेच सुरक्षा अधिकारी भाऊ शिंदे यांच्यासह कारखान्याचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here