कोल्हापूर : गडहिंग्लज साखर कारखान्याच्या १५ वर्षाच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढण्याची तयारी – मंत्री मुश्रीफ

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकाारी बँकेेने गडहिंग्लज साखर कारखान्याला थकीत भविष्य निर्वाह निधीपोटी साडेपाच कोटी, २५ टक्क्यांप्रमाणे ग्रॅच्युईटी दीड कोटी, हंगामी कर्मचाऱ्यांची रिटेन्शन ६५ लाख मिळून सुमारे पावणेआठ कोटी कारखान्याने अदा केले. त्याबद्दल साखर कामगार युनियनतर्फे मंत्री हसन मुश्रीफ यांचा येथील राष्ट्रवादी कार्यालयात कृतज्ञतापर सत्कार झाला. साखर कामगार युनियनचे जनरल सेक्रेटरी अशोक मेंडुले यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश पताडे, उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, संचालक सतीश पाटील, कामगार उपस्थित होते. यावेळी गेल्या दोन वर्षात हंगाम चांगला न गेल्याने कारखान्याचा तोटा वाढला असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री मुश्रीफ म्हणाले की, गडहिंग्लज कारखान्याला जिल्हा मध्यवर्ती बँकेने नियम बाजूला ठेवून कर्ज दिले. परंतु, गेली दोन वर्षे हंगाम चांगला न गेल्यामुळे तोटा वाढला आहे. साखरेचे दर, वाढती एफआरपी, तोडणी-वाहतुकीची बिले आणि कामगारांचे पगार, यामुळे कारखाना आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे गेल्या १०-१५ वर्षांची कारखान्याची श्वेतपत्रिका काढायला तयार आहोत. मतदारसंघामधील अनेक गावे, कार्यकर्ते आणि कर्मचारी जोडले असल्याने अडचणीतून कारखाना बाहेर काढण्यासाठी ‘ब्रिक्स’ कंपनीला चालवायला दिला. ८ वर्षे कंपनीने कारखाना चांगला चालवला. उसाची एफआरपी, कामगार व तोडणी वाहतूकदारांची देणीही दिली. सुमारे १०० कोटीचा तोटाही सहन केला. परंतु, काही राजकीय लोकांच्या तक्रारीमुळे, कामगारांच्या अडचणीमुळे कंपनीने २ वर्ष आधीच कारखाना सोडला असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी संचालक सतीश पाटील यांचेही भाषण झाले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here