कोल्हापूर : बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा वेदगंगा साखर कारखान्यात मिल रोलर पूजन कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार के. पी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास उपाध्यक्ष मनोज फराकटे, संचालक सुनीलराज सूर्यवंशी, धनाजीराव देसाई, राजेंद्र पाटील, पंडितराव केणे, उमेश भोईटे, मधुकर देसाई, के. ना. पाटील, पाटील, आप्पासो ऊर्फ ए. वाय. पाटील यांच्यासह व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, कार्यकारी संचालक एस. एन. घोरपडे उपस्थित होते. कारखान्याने १० लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले असून यंदाही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उच्चांकी ऊस दर देण्यासाठी संचालक मंडळ कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष पाटील यांनी केले.
अध्यक्ष पाटील यांनी साखर कारखान्याने आगामी गळीत हंगामात दररोज प्रतिदिन आठ हजार टन क्षमतेने गाळप करण्याचे नियोजन केले असल्याचे सांगितले. कार्यक्षेत्रातील सर्व ऊस वेळेत गाळप करण्याचे नियोजन केले आहे. ऊस उत्पादक सभासदांनी नोंदविलेला ऊस बिद्री कारखान्याकडे पाठवून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. वर्क्स मॅनेजर जी. जी. लोकरे यांनी कारखान्यात सुरू असलेल्या मशिनरी दुरुस्ती, देखभाल व जोडणी कामांची माहिती सांगितली. यावेळी दत्तात्रय पाटील, सत्यजित जाधव, राहुल देसाई, रणधीर मोरे, रंगराव पाटील, दीपक किल्लेदार, रवींद्र पाटील, राजेंद्र भाटळे, संभाजीराव ऊर्फ एस. बी. पाटील, रणजित मुडूकशिवाले, फिरोजखान पाटील, फत्तेसिंग भोसले-पाटील, भूषण पाटील, रामचंद्र कांबळे आदी उपस्थित होते.


















