लातूर : श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याच्या आसवानी प्रकल्पाचे भूमिपूजन

लातूर : विना सहकार, नाही उद्धार या विचारांवर विश्वास ठेवत सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले. येथील श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचा आसवानी प्रकल्प व मिल रोलर पूजनप्रसंगी शनिवारी ते बोलत होते.

माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले, गत हंगामात मांजरा परिवारातील साखर कारखान्यांनी ५० लाख मेट्रिक टनांहून अधिक ऊस गाळप केला. त्यातून शेतकऱ्यांच्या खात्यात १,५०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा झाली. ऊस वाहतूकदारांच्या खात्यात सुमारे ५०० कोटी रुपये जमा झाले. त्यामुळे बाजारपेठेत दोन हजार कोटी रुपयांहून अधिकची उलाढाल झाली.

ChiniMandi WhatsApp Channel

आमदार अभिमन्यू पवार म्हणाले, श्री संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखान्याच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून आवश्यक ती सर्व मदत मिळवून देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहू. या कारखान्याच्या माध्यमातून माझ्या राजकीय कारकिर्दीचा उदय झाला. त्यामुळे या संस्थेबद्दल माझे विशेष ऋणानुबंध आहेत, असे सांगितले.

यावेळी साखर संघाचे संचालक आबासाहेब पाटील, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अॅड. प्रमोद जाधव, रेणा कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रवीण पाटील, सचिन दाताळ, संतोष देशमुख, उदयसिंह देशमुख, बाजार समितीचे सभापती चंद्रशेखर सोनवणे, उपसभापती भीमाशंकर राचट्टे, आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सचिन पाटील यांनी, सूत्रसंचालन प्रदीप पाटील यांनी केले. आभार गणपती बाजुळगे यांनी मानले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here