बुलढाणा : पेनगंगा साखर कारखाना परिसरात १००१ वृक्ष लागवडीचा संकल्प

बुलढाणा : तालुक्यातील पेनगंगा साखर कारखाना वरुड, (धाड) येथील औद्योगिक विकासाबरोबर हरित पर्यावरण हाच भावी पिढीसाठी अमूल्य ठेवा आहे. बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीसह पेनगंगा साखर उद्योगाच्या विकासासाठी भक्कम योगदान दिले आहे. ग्रामीण भागात उद्योग उभे राहावेत, शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम, सुखी व संपन्न व्हावेत आणि रोजगार निर्मितीला चालना मिळून जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या व्यापक उद्देशाने त्यांनी पेनगंगा साखर कारखान्यास महत्त्वपूर्ण आर्थिक पाठबळ दिले. त्यांच्या पर्यावरण संवर्धनाच्या संकल्पनेतून प्रेरणा घेत पेनगंगा साखर कारखाना प्रा. लि. वरुड (धाड) येथे कारखाना परिसरात पहिल्या टप्प्यात १,००१ विविध प्रजातींच्या वृक्षारोपण मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला.

याबाबत पेनगंगा साखर कारखान्याचे चेअरमन अनिल गुंजाळ यांनी सांगितले की, राधेश्याम चांडक यांच्या प्रेरणेतून विकासाबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संकल्प यशस्वीपणे पुढे नेला जात आहे. चांडक यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या औद्योगिक, सामाजिक व आर्थिक विकासाला नवी दिशा मिळाली आहे. शेतकरी, उद्योग आणि रोजगार यांचा समतोल साधत त्यांनी विकासाचा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या विचारधारेचा वारसा जपत पेनगंगा साखर कारखाना हरित क्रांतीच्या दिशेने ठामपणे पाऊल टाकत आहे. कारखाना परिसरात पहिल्या टप्प्यात १,००१ वृक्षारोपण मोहिमेचा प्रारंभ करण्यात येत आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here