सातारा : कराड तालुका साखर कामगार युनियनतर्फे कृष्णा कारखान्याच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल डॉ. सुरेश भोसले यांचा सत्कार

सातारा : कराड तालुका साखर कामगार युनियनच्यावतीने य. मो. कृष्णा कारखान्याच्या चेअरमनपदी डॉ. सुरेश भोसले व व्हाईस चेअरमनपदी जे. डी. मोरे यांची निवड झाल्याबद्दल युनियनचे अध्यक्ष एम. के. कापूरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. साखर कामगार संघ व कराड तालुका गणेशोत्सव मंडळाच्यावतीनेही नूतन चेअरमन डॉ.भोसले यांचा सत्कार झाला.

या प्रसंगी कामगार युनियनचे अध्यक्ष एम. के. कापूरकर म्हणाले की, डॉ. सुरेश भोसले यांनी कामगारांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. भरीव पगार वाढ दिली त्यामुळे त्यांच्या कामकाजाबद्दल कामगारवर्गात आदर आहे. तर चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी सांगितले की, आम्ही कारखान्यात कामगारांना केंद्रबिंदू मानून कामगारांच्या अडचणी सोडविल्या आहेत. कामगारांना संचालक मंडळाने तीन वेळा भरीव पगार वाढ दिली दिली आहे. याप्रसंगी वसंतराव पवार यांनी आभार मानले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here