बीड : ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठीचे शासकीय इमारतीमधील वसतिगृह सज्ज, लवकरच उद्घाटन

बीड : लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ अंतर्गत ऊसतोड कामगारांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. महामंडळांतर्गत संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेतून राज्यभरातील दहा जिल्हांमध्ये ६२ वसतिगृहे बांधली जाणार आहेत. या योजनेंतर्गत मान्यता देण्यात आलेल्या एकूण ८२ शासकीय वसतिगृहापैकी पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आलेली २० शासकीय वसतिगृहे वगळता उर्वरित शासकीय वसतिगृह सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. अनेक वस्तीगृह हे तात्पुरत्या स्वरुपात भाड्याच्या जागांमध्ये हे वसतिगृह कार्यान्वीत आहेत. तर बीडमधील पहिले शासकीय इमारतीतील वसतिगृह सज्ज झाले आहे. लवकरच याचे उद्घाटन होणार आहे. यामध्ये ऊसतोड कामगारांच्या शंभर मुलांना इयत्ता पाचवी ते पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी निवास, भोजनाची सोय करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील गेवराईमध्ये २, माजलगावमध्ये २, केजमध्ये २, परळीमध्ये २, पाटोदा येथे २ व बीड येथे दोन अशी मुला-मुर्तीसाठी वसतिगृह बांधकाम प्रस्तावित आहेत. यातील बीडमधील वसतिगृहाचे काम पूर्ण झाले आहे तर शिरुर येथील बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. तर उर्वरित ठिकाणच्या बांधकामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. बीडमधील वस्तीगृहाचे लवकरच उद्घाटन होणार असून या ठिकाणी शंभर मुलांच्या निवास व भोजनाची सोय होऊ शकणार आहे. प्रथम टप्प्यात मुलांसाठी १० व मुर्तीसाठी १० अशी एकूण २० शासकीय वसतिगृहे सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. बीडमधील केवळ तीन ठिकाणी शासकीय जागा उपलब्ध झाली असून त्या ठिकाणी वसतिगृहाचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. उर्वरीत १९ वसतिगृहांपैकी ११ जागा उपलब्ध असलेल्या वसतिगृहांच्या बांधकाम अंदाजपत्रकास प्रशास मान्यता देण्यात आली असून त्याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय विभागातर्फे जारी करण्यात आला आहे. यामध्ये पाटोदा, केज, परळी, गेवराई, माजलगाव येथे प्रत्येकी दोन आणि बीड येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहाचा समावेश आहे. ऊसतोड कामगार पाल्यांसाठीच्या या वसतिगृहात प्रवेशासाठी विद्यार्थी हा ऊसतोड कामगाराचा पाल्य असणे आवश्यक आहे. यामध्ये जातीची अथवा उत्पन्नाची कोणतीही अट नाही. याि प्रवेश देतांना नियमांचे पालन करत पात्र विद्यार्थ्यांनाच प्रवेश गेल्यास, ऊसतोड कामगारांच्या पुढच्या पिढीच्या हातचा कोयता सुटण्यास मदत होणार आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here