ओंकार ग्रुपची भरारी, बिदर जिल्ह्यातील गौरी शुगरमध्ये विक्रमी १ कोटी लिटर इथेनॉल उत्पादन

पुणे : गुणवत्तापूर्ण सुरक्षित उत्पादन, कार्यपद्धती, पर्यावरणपूरक उद्योगधोरण आणि शेतकरी हिताला प्राधान्य देत ओंकार ग्रुप सातत्याने प्रगती करत आहे. इथेनॉल उत्पादनामुळे देशाच्या ऊर्जा स्वावलंबनाला बळ मिळत असून पर्यावरणपूरक इंधनाच्या वापरालाही चालना मिळत आहे. कर्नाटकातील बीदर जिल्ह्यातील भालकी तालुक्यातील बाजोलगा येथे कार्यरत असलेल्या गौरी शुगर अॅड डिस्टिलरीज प्रा. लि. (युनिट क्र. १३) ने १ कोटी लिटर इथेनॉल उत्पादनाचा ऐतिहासिक टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे, अशी माहिती ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे-पाटील यांनी दिली. या यशात योगदान देणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, तंत्रज्ञ, शेतकऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.

गौरी शुगर अँड डिस्टिलरीजने गाठलेला हा टप्पा इथेनॉल उत्पादन क्षेत्रातील महत्त्वाचा मैलाचा दगड मानला जात असून, उद्योगाची उत्पादनक्षमता आणि पर्यावरणपूरक ऊर्जानिर्मितीतील योगदान अधिक बळकट झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. याविषयी बाबूराव बोत्रे-पाटील म्हणाले की, एक कोटी लिटर इथेनॉल उत्पादनाचा टप्पा हा केवळ आकडा नसून सर्वाच्या एकजुटीचा, प्रामाणिक परिश्रमाचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराचा परिणाम आहे. ओंकार ग्रुपमधील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी, तंत्रज्ञ आणि ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमामुळेच हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठणे शक्य झाले आहे. या यशामागे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास, ऊसपुरवठा, अधिकारी व कर्मचाऱ्यांची निष्ठा, तंत्रज्ञांचे कौशल्य आणि व्यवस्थापनाचे प्रभावी नियोजन यांचे मोठे योगदान आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here