पुणे : डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्टच्यावतीने उद्योजक एस. बी. भड यांचा ‘साखर उद्योग गौरव’ पुरस्काराने सन्मान

पुणे : डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या ७१ व्या वार्षिक अधिवेशनात साखर उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल उद्योजक एस. बी. भड यांना ‘साखर उद्योग गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चार दशकांहून अधिक काळ एस. एस. इंजिनिअर्स साखर उद्योग इंजिनिअरिंग क्षेत्रातील आघाडीचे नाव आहे. ‘टर्न की प्रोजेक्ट्स’मध्ये त्यांचा दबदबा आहे. या क्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला.

एस. बी. भड हे एस. एस. इंजिनिअर्सचे संस्थापक आणि अध्यक्ष असून साखर यंत्रसामग्री व प्रकल्पांच्या निर्मितीत त्यांचे मोठे योगदान आहे. डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते भड यांचा गौरव करण्यात आला. राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, असोसिएशनचे अध्यक्ष सोहन शिरगावकर, राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते, शेखर गायकवाड, श्रीमंत पाटील आदी या समारंभाला उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here