इथेनॉल उत्पादनासाठी साखरेच्या वापरामुळे दरवाढ झाल्याचा दावा सरकारने फेटाळला

नवी दिल्ली : ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने इथेनॉल उत्पादनासाठी साखरेचा वापर केल्यामुळे साखरेच्या दरात मोठी वाढ होत असल्याचा दावा शुक्रवारी फेटाळून लावला. इथेनॉल बनवण्याकरिता वापरल्या जाणाऱ्या साखरेचा वाटा २०२२-२३ मधील सुमारे १२ टक्क्यांवरून २०२५-२६ हंगामात सुमारे नऊ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. भारताच्या इथेनॉल उत्पादनापैकी जवळपास तीन-चतुर्थांश उत्पादन आता धान्यांपासून, विशेषतः मक्यापासून होते, असे सरकारच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. दरवाढ रोखण्यासाठी आणि पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी, सरकारने देशभरातील साखर व्यापाऱ्यांवर ३० नोव्हेंबरपर्यंत ४०० टन साखरेच्या साठ्याची मर्यादा घातली आहे. १ सप्टेंबरपासून, मोठ्या ग्राहकांनाही १५ दिवसांच्या वापरापेक्षा जास्त साठा ठेवण्यास मनाई असेल.

याबाबत सरकारने स्पष्ट केले आहे की, ऊस उत्पादक राज्यांच्या सुरुवातीच्या अंदाजानुसार सुमारे ३४.३ दशलक्ष टन उत्पादनाचा अंदाज असताना, चालू हंगामात देशांतर्गत साखर उत्पादन सुमारे ३०.६ दशलक्ष टन राहण्याची अपेक्षा आहे. उसावरील रेड रॉट रोग आणि टॉप बोररचा प्रादुर्भाव, अतिवृष्टीमुळे साचलेले पाणी यामुळे ऊस उत्पादनातील तूट आली आहे. सध्याच्या साखरेच्या दरवाढीमागे सणासुदीच्या हंगामापूर्वी वाढलेली मागणी, हवामानामुळे पिकांचे झालेले नुकसान, जागतिक पुरवठ्यातील घट आणि उद्योगातील काही घटकांकडून होणारी सट्टेबाजी व साठेबाजी ही कारणे असल्याचे सरकारने म्हटले आहे. साखरेचे देशांतर्गत कमी उत्पादन, सणासुदीच्या हंगामातील मागणी आणि साठेबाजीमुळे किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी साठ्यावर मर्यादा घालून शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. देशात १० लाख टन कच्च्या साखरेची आयात केली जाणार आहे.साखर बाजारभाव

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here