ओंकार शुगर ग्रुपच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी तेजस्विनी बर्गे यांची नियुक्ती : अध्यक्ष बाबूराव बोत्रे-पाटील यांची माहिती

पुणे : ओंकार शुगर ग्रुपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावर तेजस्विनी बर्गे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे-पाटील यांनी ही माहिती दिली. नियुक्तीनंतर ओंकार ग्रुपच्या वतीने अध्यक्ष बाबूराव बोत्रे-पाटील आणि संचालक ओमराजे बोत्रे-पाटील यांच्या हस्ते तेजस्विनी बर्गे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी समूहातील वरिष्ठ अधिकारी तसेच मुख्य कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

समूहाच्या प्रगतीसाठी नेतृत्व महत्त्वाचे ठरणार

ChiniMandi WhatsApp Channel

तेजस्विनी बर्गे यांचे नेतृत्व, अनुभव, दूरदृष्टी आणि कार्यक्षमता ओंकार शुगर ग्रुपच्या पुढील वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास अध्यक्ष बाबूराव बोत्रे-पाटील यांनी व्यक्त केला. ओंकार शुगर ग्रुपने विविध क्षेत्रांत कार्याचा विस्तार करत उल्लेखनीय प्रगती साधली आहे. समूहाच्या वाढत्या कार्यक्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बर्गे यांच्या नियुक्तीमुळे समूहाच्या विकासाला आणखी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

विकासाला नवी दिशा मिळेल : तेजस्विनी बर्गे

मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तेजस्विनी बर्गे यांनी समूहाच्या पुढील विकासाबाबत विश्वास व्यक्त केला. ओंकार शुगर ग्रुपच्या प्रगतीला यापुढील काळात नवी दिशा मिळेल आणि विस्ताराचा प्रवास अधिक गतिमान होईल, असे त्यांनी सांगितले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here