पुणे : माळेगाव कारखाना गेटकेनधारकांनाही प्रतिटन ३५०० रुपये ऊस दर देणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा ७० व्या ऊस गळीत हंगामाचा प्रारंभ सोमवारी (ता.१२) कारखान्याच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष नितीन शेंडे यांच्या हस्ते झाला. कारखान्याने यंदा १२ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. कमी पावसामुळे उसाच्या उत्पादनात १५ ते २० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. तरीही गेटकेनधारकांनाही प्रतिटन ३५०० रुपये दर देण्यात येणार आहे अशी घोषणा कारखान्याच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी केली. कारखान्याने गेल्यावर्षी सभासदांना गाळप झालेल्या उसापोटी प्रतिटन ३६५० रुपये अंतिम ऊस दर जाहीर केला आहे. तसेच सभासदांना ३५०० रुपये प्रतिटन याअगोदरच अदा केले आहे. उर्वरित १५० रुपये प्रतिटन दिवाळीला दिले जाणार आहेत. गेटकेनधारकांनाही ३४०० पैकी उर्वरित शंभर रुपये सणाला दिले जाणार आहेत अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.

सुनेत्रा पवार म्हणाल्या की, महत्त्वाकांक्षी सीबीजी प्रकल्पासाठी सुमारे ७० कोटी रुपये खर्च होणार आहेत. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या ऊस दरात नक्कीच वाढ होणार आहे. सन २०२६-२७ च्या हंगामासाठी झाली आहेत. उपाध्यक्ष नितीन शेंडे यांनी कारखाना परिसरातील स्वच्छता अधिक प्रभावी करण्यासाठी सुमारे ४० लाख रुपये किमतीची रोड स्वीपिंग मशिन उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती दिली. दरम्यान, गळीत हंगाम प्रारंभासोबतच पहिल्या हप्त्याची चर्चा सुरू झाली आहे. वास्तविक यंदा ऊस टंचाईचा विचार करता माळेगावचा पहिला हप्ता लक्षवेधी असेल, असे सांगण्यात आले. माळेगावची यंदाची एफआरपी सुमारे ३४५० इतकी प्रतिटन आहे. त्यामुळे येथील प्रशासनाकडून आगामी काळात ३५०० रुपये प्रतिटन पहिला हप्ता देण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कार्यक्रमाला माजी अध्यक्ष केशवराव जगताप, विश्वासराव देवकाते, किरण तावरे, अविनाश गोफणे, बाळासाहेब तावरे, संगीता कोकरे, शिवराज जाधव, राजेंद्र बुरुंगले, तानाजी कोकरे आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here