पुणे : संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याकडून सभासदांना प्रतिकिलो २५ रुपये दराने साखर रवाटप

पुणे : दिवाळीनिमित्त संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्यावतीने सभासद शेतकऱ्यांना प्रतिकिलो २५ रुपये दराने साखर वाटप करण्यात येणार आहे. शुक्रवारपासून (ता. १६) गटनिहाय साखर वितरणाला सुरुवात होणार आहे. साखर घेण्यासाठी सभासदांनी साखरवाटप स्मार्ट कार्ड सोबत आणावे. ज्या सभासदांना स्मार्ट कार्ड मिळालेले नाही किंवा ज्यांचे कार्ड हरवले आहे, त्यांनी कारखाना स्थळावर केवायसी प्रक्रिया पूर्ण करून नवीन स्मार्ट कार्ड घ्यावे. गटनिहाय साखर वितरणाचे वेळापत्रक तयार करण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक एस.जी.पठारे यांनी दिली. सभासदांनी किंवा कार्ड घेण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीचे मूळ आधार कार्ड, पॅन कार्ड अथवा वाहनचालक परवाना यापैकी एक मूळ ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे, असे सांगण्यात आले.

दि. १६ पासून साखर वितरणास सुरुवात होत आहे. यामध्ये पहिले दोन दिवस भोसे गट कार्यालय आणि मरकळ गट कार्यालय येथे तर १९ रोजी बहुळ (मराठी शाळेजवळ) आणि चांदोली गट कार्यालयात साखर मिळेल. दि. २१ रोजी कोरेगाव भीमा कार्यालय आणि चाकण मार्केट यार्डमध्ये आणि दि. २२ रोजी पिंपळे जगताप चौफुला कार्यालयात साखर वितरण होणार आहे. दि. २२ व २३ रोजी मुठा कार्यालयात तर दि. २३ व २४ रोजी इंदोरी कार्यालयात साखर वाटप होईल. दि. २४ रोजी संकल्प मंगल कार्यालय, चोली आणि विरंगुळा केंद्र, ज्येष्ठ नागरिक संस्था, नव महाराष्ट्र विद्यालय, पिंपरीगाव आणि दि. २६ व २७ रोजी सुचंद्रिका मंगल कार्यालय, घोटावडे आणि पैसाफंड प्राथमिक शाळा, तळेगाव स्टेशन येथे साखर मिळेल. दि. २८ व २९ रोजी पौड कार्यालय (एसटी स्टँडजवळ) आणि येळसे ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी आणि दि. ३० व ३१ रोजी संत तुकाराम मंगल कार्यालय, गाथा मंदिराजवळ, देहूगाव आणि शिवशंकर मंगल कार्यालय, कामशेत येथील सभासदांना साखर मिळेल. नोव्हेंबर महिन्यात दि. २ रोजी भैरवनाथ मंदिर, धायरी; कोळवण एसटी स्टँडजवळ आणि संचेती लॉन्स, लोणावळा आणि २ ते ५ नोव्हेंबर याा काळात कारखाना स्थळावर कासारसाई व सोमाटणे गटातील सभासदांसाठी साखरवाटप केले जाणार आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here