कोल्हापूर : बिद्री साखर कारखान्याकडून उच्चांकी ऊसदर देण्याची अध्यक्ष के. पी. पाटील यांची घोषणा

कोल्हापूर : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचा ६४ वा ऊस गळीत हंगाम प्रारंभ नुकताच उत्साहात झाला. संचालकांच्या हस्ते गव्हाणीत ऊस मोळी टाकून गळीताचा प्रारंभ करण्यात आला. संचालक पंडितराव केणे व त्यांच्या पत्नी सुहासिनी केणे यांच्या हस्ते विधीवत गव्हाण पूजन करण्यात आले. ऊस तोडणीचा प्रारंभ संचालक दीपक किल्लेदार व ऊस वजन काट्याचे पूजन संचालक रणधीर मोरे यांच्या हस्ते झाले. कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी आमदार के. पी. पाटील यांनी दुष्काळी परिस्थिती, वाढता ऊस उत्पादन खर्च आणि केंद्र सरकारच्या साखर व इथेनॉलविषयक धोरणांमुळे गळीत हंगाम आव्हानात्मक ठरणार आहे. मात्र, या संकटांवर मात करून बिद्री कारखाना उच्चांकी ऊसदराची परंपरा यंदाही कायम ठेवेल. अशी ग्वाही दिली.

कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील म्हणाले की, यंदा दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. माळरानावरील ऊस पिके वाळू लागली आहेत. खते, औषधे, मजुरी आणि अन्य खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्या तुलनेत एफआरपीमधील वाढ मर्यादित असल्याने त्यात आणखी वाढ होणे आवश्यक आहे. मात्र, साखरेचे विक्रीदर वाढविण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक निर्णय घेत नसल्याने कारखान्यांच्या आर्थिक गणितावर परिणाम होत आहे. उपाध्यक्ष मनोज फराकटे, संचालक मंडळ, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, कार्यकारी संचालक एस. एन. घोरपडे यांच्यासह सभासद, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संचालक सुनीलराज सूर्यवंशी यांनी आभार मानले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here