2026-27 गाळप हंगाम : राज्यात 28 ऑक्टोबरपर्यंत 106 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरु, 48.65 लाख क्विंटल साखर उत्पादन

कोल्हापूर : महाराष्ट्रात 2026-27 ऊस गाळप हंगामाला सुरुवात झाली असून, 28 ऑक्टोबरपर्यंत 106 साखर कारखान्यांकडून 48.65 लाख क्विंटल साखर उत्पादन करण्यात आले आहे. साखर आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यात 64.91 लाख टन ऊस गाळप पूर्ण झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा 7.49 टक्के इतका आहे.

राज्यात सध्या 51 सहकारी आणि 55 खाजगी कारखाने सुरु झाले आहेत. अन्य कारखानेही लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. मागील हंगामात 28 ऑक्टोबरपर्यंत राज्यात केवळ 2 खाजगी कारखाने सुरु झाले होते. सध्या सोलापूर विभागात सर्वाधिक 26 साखर कारखाने सुरु झाले आहेत. त्यामध्ये 10 सहकारी आणि 16 खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. या सर्व कारखान्यांनी आतापर्यंत 13.34 लाख टन उसाचे गाळप करून 9.52 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. विभागाचा सरासरी उतारा 7.14 टक्के इतका आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

सोलापूर पाठोपाठ नांदेड विभागात 22 कारखाने सुरु झाले असून त्यामध्ये 9 सहकारी आणि 13 खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. कारखान्यांनी 7.88 लाख टन उसाचे गाळप करून 5.05 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या विभागाचा साखर उतारा 6.41 टक्के आहे. अहिल्यानगर विभागातील 20 कारखान्यांनी आपले गाळप सुरु केले आहे. त्यामध्ये 11 सहकारी आणि 9 खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. 7.53 टक्के उताऱ्यासह कारखान्यांनी 12.57 लाख टन ऊस गाळप करून 9.46 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.

पुणे विभागात 15 कारखाने सुरु झाले असून त्यामध्ये 10 सहकारी आणि 5 खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. विभागात तब्बल 16.4 लाख टन उसाचे गाळप झाले असून 13.59 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. विभागाचा उतारा 8.29 टक्के आहे.छत्रपती संभाजीनगर विभागात 13 कारखाने सुरु झाले आहे. त्यामध्ये 6 सहकारी आणि 7 खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. या सर्व कारखान्यांनी आतापर्यंत 8.23 लाख टन उसाचे गाळप करून 5.52 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. या विभागाचा साखर उतारा केवळ 6.71 टक्के इतका आहे.

कोल्हापूर विभागातील साखर हंगामाला शेतकरी संघटनांच्या आंदोलनाची झळ बसल्याचे पाहायला मिळत आहे. या विभागात आतापर्यंत केवळ 9 कारखानेच सुरु झाले आहेत. त्यामध्ये 5 सहकारी आणि 4 खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. अन्य साखर कारखाने ऊसदराचा तोडगा निघण्याच्या प्रतीक्षेत आहेत. विभागात 5.72 लाख टन उसाचे गाळप होऊन 4.97 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. विभागाचा उतारा राज्यात सर्वाधिक 8.69 टक्के इतका आहे. अमरावती विभागात एकच खाजगी कारखाना सुरु झाला असून आतापर्यंत 0.77 लाख टन उसाचे गाळप होऊन 0.54 लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. विभागाचा सरासरी उतारा 7.01 टक्के आहे. नागपूर विभागात अद्याप एकही कारखाना सुरु झाला नसल्याचे दिसते.

कोल्हापूर जिल्ह्यात ५ हजार रुपये दरासाठी ‘छावणी’ आंदोलनाचा राजू शेट्टींचा इशारा

उसाला प्रतिटन ५ हजार रुपये दर मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या ऊसदर आंदोलनाने आक्रमक वळण घेतले आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या आंदोलनाची व्याप्ती कोल्हापूर जिल्ह्यासह सीमाभागात वाढली असून, अनेक ठिकाणी साखर कारखान्यांकडे जाणारी ऊस वाहतूक रोखण्यात आली आहे. काही ठिकाणी ऊस वाहतुकीच्या वाहनांची तोडफोड आणि ट्रॅक्टर उलटविण्याच्या घटनाही घडल्या आहेत. दरम्यान, ऊसदर जाहीर होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here