पुणे : श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने बोर्ड मिटिंगमध्ये कामगारांना १५ टक्के बोनस जाहीर केला आहे. बोनसमधील १० टक्के रक्कम दिवाळीसाठी व उर्वरित ५ टक्के रक्कम मकरसंक्रांतीला देण्याचे ठरले आहे. त्यानुसार, दिवाळी बोनसची २ कोटी ४१ लाख ७१ हजार रुपये रक्कम शुक्रवारी (ता. ३०) कामगारांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली. कारखान्यातील ८०५ कामगारांना या बोनसचा फायदा मिळणार आहे. बोनस लवकर दिल्याबद्दल कामगार संघटनेच्या वतीने संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला. या वेळी कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, उपाध्यक्ष शिवाजी निंबाळकर, संचालक कैलास गावडे, अॅड. शरद जामदार, रामचंद्र निंबाळकर आदी उपस्थित होते.
साखर कारखान्यातील ८०५ कामगारांच्या खात्यामध्ये दिवाळी बोनसची रक्कम जमा करण्यात आली आहे. दिवाळीच्या आठ दिवस अगोदर बोनस जमा करणारा जिल्ह्यातील पहिलाच सहकारी कारखाना ठरला आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली. छत्रपती कारखान्याचे कामगार व अधिकारी चांगले काम करीत असून कारखाना क्षमतेपेक्षा जास्त गाळप करीत आहे. गेल्या आठवड्यामध्ये सर्वांच्या सहकार्यामुळे विक्रमी गाळपाचा टप्पा दोन वेळा गाठला आहे. कामगारांचे पगार वेळेपूर्वीच खात्यावर जमा करीत असल्याचे संचालक मंडळाने सांगितले. या कार्यक्रमाला संचालक पृथ्वीराज घोलप, गणपतराव कदम, प्रशांत दराडे, अजित नरुटे, विठ्ठलराव शिंगाडे, अनिल काटे, बाळासाहेब कोळेकर, नीलेश टिळेकर, संतोष मासाळ, माधुरी राजपुरे, सुचिता सपकळ, सतीश देवकाते, अशोक पाटील, मंथन कांबळे, डॉ. योगेश पाटील, तानाजी शिंदे, हणमंत घोळवे, सत्यवान चव्हाण, कार्यकारी संचालक अशोक जाधव, कामगार नेते युवराज रणवरे उपस्थित होते.


















