बेळगाव : वीज वाहिनी तुटल्यामुळे एकसंबा येथे आग, ५० एकर ऊस खाक

बेळगाव : दूधगंगा नदीकाठावर दत्तवाड मार्गावरील ट्रान्स्फॉर्मरजवळील विजेची मुख्य वाहिनी तुटल्याने लागलेल्या आगीत जवळपास ५० एकर ऊस जळून खाक झाला. हेस्कॉमच्या मुख्य वीज वाहिनीत अचानक बिघाड होऊन ती तुटली. त्याच्या ठिणग्या खाली शेतात पडल्या. वाळलेल्या पाचटामुळे आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केले. वाऱ्याच्या वेगाने आग आजूबाजूच्या शेतात पसरली व ५० एकरांतील ऊस आगीत जळून खाक झाला. अग्निशामक दल व शेतकऱ्यांच्या प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आली, मात्र या दुर्घटनेत एकसंबा येथील अकरा शेतकऱ्यांचे लाखांचे नुकसान झाले.

हेस्कॉमच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. या घटनेत मुजावर, जमादार, चिदानंद मोपगार, कृष्णा जाधव, अर्जुन बाकळे, गुरुलिंग जाधव, अरुण गवळी, शिवानंद कल्याणी, तुकाराम कमते, सदाशिव कमते, सदाशिव कल्याणी, काशिनाथ कल्याणी या शेतकऱ्यांचा ऊस जळाला आहे. आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. चिदानंद कोरे सहकारी साखर कारखाना, सदलगा अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनीही आग रोखण्याचे प्रयत्न केले. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हेस्कॉमने पंचनामा करून योग्य ती भरपाई द्यावी तसेच शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here