सातारा : ‘कृष्णा’च्या सभासदांची दिवाळी गोड; ठेवींवरील 2.61 कोटींचे व्याज बँक खात्यात जमा

सातारा : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने शेतकरी सभासदांच्या ठेवींवरील व्याजाची एकूण 2 कोटी 61 लाख 93 हजार 164 रुपयांची रक्कम संबंधित सभासदांच्या बँक खात्यांमध्ये जमा केली आहे. दिवाळीपूर्वीच ही रक्कम मिळाल्याने कारखान्याच्या सभासदांची दिवाळी गोड झाली असून शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सभासदांच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले जात आहे. त्याचाच भाग म्हणून सभासदांच्या ठेवींवरील व्याजाची रक्कम नुकतीच थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यात आली.

उसाला प्रतिटन 3,500 रुपये दर; 496 कोटींपेक्षा अधिक रक्कम अदा

ChiniMandi WhatsApp Channel

मागील गळीत हंगामात कारखान्याकडे गाळपासाठी आलेल्या उसाला प्रतिटन 3,500 रुपयांचा उच्चांकी दर देण्यात आला होता. या दरानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण 496 कोटी 75 लाख 79 हजार 832 रुपये यापूर्वीच जमा करण्यात आले आहेत.याशिवाय, शेतकरी सभासदांच्या ठेवींवरील व्याजापोटी 2 कोटी 61 लाख 93 हजार 164 रुपयांची रक्कमही अदा करण्यात आली आहे. त्यामुळे उसाच्या दरासोबतच ठेवींवरील व्याजाचा लाभही सभासदांना मिळाला आहे.

पारदर्शक कारभारामुळे सभासदांचा विश्वास दृढ

कारखान्याकडून वेळोवेळी घेतले जाणारे शेतकरी हिताचे निर्णय आणि पारदर्शक कारभार यामुळे सभासदांचा विश्वास अधिक दृढ होत असल्याचे चित्र आहे. दिवाळीपूर्वीच ठेवींवरील व्याजाची रक्कम बँक खात्यात जमा झाल्याने सभासदांना सणासुदीच्या काळात आर्थिक दिलासा मिळाला आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here