जळगाव : चोपडा साखर कारखान्याचा सहावा गाळप हंगाम लवकरच सुरू होणार; ऊसपुरवठ्याचा प्रश्नही मार्गी

जळगाव : चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या (चोसाका) २०२६-२७ या गाळप हंगामाबाबत गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेली अनिश्चितता आता संपुष्टात आली आहे. सर्वपक्षीय नेते, कारखान्याचे संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांच्या बैठकीत कारखाना स्वबळावर सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. एका कंपनीचे सहकार्य मिळणार असल्याने कारखान्याचा सहावा गाळप हंगाम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कारखाना सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला आर्थिक निधी उभारण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू आहेत. उत्पादित होणारी साखर आणि मळी देण्याच्या अटीवर व्यापाऱ्यांकडून ५ ते ६ कोटी रुपयांचा आगाऊ निधी उपलब्ध करून घेण्याबाबत चर्चा सुरू आहे. या निधीमुळे कारखान्याच्या सुरुवातीच्या आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. यापूर्वी मजुरांसोबत झालेल्या करारानुसार आवश्यक कामगार आणि अधिकारी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. मात्र, या कर्मचाऱ्यांचे वेतन कारखाना प्रशासनाला द्यावे लागणार आहे. त्यामुळे मनुष्यबळाचा प्रश्नही मार्गी लागण्याची शक्यता आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

दरम्यान, यंदाच्या गाळप हंगामासाठी आवश्यक असलेला क्रशिंग लायसन्स अर्थात गाळप परवाना कारखान्याला प्राप्त झाला आहे. आर्थिक निधीची उपलब्धता, ऊसपुरवठ्याचे नियोजन आणि आवश्यक मनुष्यबळ याबाबत सकारात्मक निर्णय झाल्याने चोसाकाचा सहावा गाळप हंगाम लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत. कारखाना स्वबळावर सुरू करण्याचा निर्णय झाला असून, गाळप परवाना मिळाल्याने तसेच आर्थिक आणि मनुष्यबळाच्या उपलब्धतेबाबत सकारात्मक मार्ग निघाल्याने यंदाचा हंगाम सुरू करण्यासाठी आवश्यक तयारी केली जात आहे, असे कारखान्याचे अध्यक्ष चंद्रहास गुजराथी यांनी सांगितले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here