धाराशिव : रस्ता सुरक्षेसाठी धाराशिव कारखान्याचा पुढाकार; ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना बसविले रिफ्लेक्टर

धाराशिव : चोराखळीतील धाराशिव साखर कारखान्याने सामाजिक जाणिव आणि जबाबदारीचे भान राखत रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कारखाना परिसरात या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. उपक्रमांतर्गत कारखान्याला ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर बसविण्यात आले. ऊस वाहतूक करणाऱ्या अनेक ट्रॅक्टर-ट्रॉलींच्या पाठीमागे रिफ्लेक्टर नसल्याने रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका निर्माण होतो. त्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी वाहनचालकांना रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले.

येरमाळा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक यशवंत घोडके आणि महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलिस उपनिरीक्षक उप्पडवाड यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. पोलिस अधिकाऱ्यांनी वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, रात्रीच्या वेळी वाहनांची सुरक्षितता आणि अपघात टाळण्यासाठी आवश्यक दक्षता याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर बसविण्यात आले. कारखान्याचे जनरल मॅनेजर ए. एस. पठाण, चीफ अकाउंटंट बोडके, मुख्य शेती अधिकारी गव्हाणे, चीफ केमिस्ट साळुंके, चीफ इंजिनिअर धालपे, ई.डी.पी. मॅनेजर लोमटे, सुरक्षा अधिकारी कागडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, ऊसतोडणी व वाहतूक ठेकेदार आणि वाहनचालक उपस्थित होते. मुख्य शेती अधिकारी गव्हाणे यांनी आभार मानले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here