पुणे : ऊस दराबाबत कारखानदारांसोबत संयुक्त बैठक घेण्याची ‘स्वाभिमानी’ची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी (ता. १७) सायंकाळी पुणे येथे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेऊन ऊस दराबाबत सविस्तर चर्चा केली. पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिह्यांप्रमाणे पुणे जिल्ह्यातही जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन ऊसदराचा तिढा सोडवावा, अशी भूमिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांचे अध्यक्ष, साखर आयुक्त, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी, संघटनेचे प्रमुख पदाधिकारी आणि ऊस उत्पादक शेतकरी यांना निमंत्रित करून संयुक्त बैठक घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रकाशतात्या बालवडकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर, पुणे शहराध्यक्ष प्रकाश म्हस्के, उपाध्यक्ष हनुमंत बालवडकर यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डुडी यांची भेट घेतली. पुणे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य व समाधानकारक ऊसदर मिळावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत अशी मागणी त्यांनी केली. कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांपाठोपाठ सोलापूर जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन साखर कारखानदार व शेतकऱ्यांच्या बैठका आयोजित केल्या. याच धर्तीवर पुण्यातील ऊसदराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here