पुणे : ऊस तोडणी कामगारावर बिबट्याचा हल्ला, वाळकी परिसरात सावधानतेचे आवाहन

पुणे : ऊसतोड करणाऱ्या कामगारावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना वाळकी परिसरात घडली आहे. आहे. मात्र बिबट्याच्या हल्ल्यात कामगाराला कोणतीही दुखापत झाली नसून, केवळ त्याचा शर्ट फाटल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर वन विभाग व पोलिस पाटील यांच्या समन्वयातून परिसरातील नागरिक, शेतकरी आणि ऊसतोड कामगारांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच नियतक्षेत्र अधिकारी अक्षय शितोळे, वनसेवक सुरेश पवार, पोलिस पाटील निळकंठ थोरात, प्रताप गाडेकर, योगेश थोरात, संजय फरतडे, बापू मागरे यांनी घटनास्थळी पाहणी व पंचनामा केला. मस्थांना बिबट्यापासून बचावासाठी आवश्यक खबरदारीचे उपाय समजावून सांगण्यात आले.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऊसतोड कामगार शेतात खाली वाकून ऊस तोडत असताना मागील बाजूने आलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. मात्र, कामगाराने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला. बिबट्याला कामगाराची स्पष्ट ओळख पटली नसावी. त्यामुळे त्याने हल्ल्याचा प्रयत्न केला असावा. मात्र, कामगाराची ओळख लक्षात येताच बिबट्याने माघार घेतल्याचा प्राथमिक अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. वन अधिकारी अक्षय शितोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार बिबट्याच्या नजरचुकीतून घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ऊसतोड कामगारांनी गळ्यात जाड फडके ठेवावे, सोबत रेडिओ सुरू ठेवावा, रात्री शेतात जाताना बॅटरी अथवा टॉर्चचा वापर करावा. आणि शक्यतो समूहाने काम करावे, अशा सूचना करण्यात आल्या.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here