छत्रपती संभाजीनगर : कोल्हापूरच्या निकषांवर ऊस दरासाठी मराठवाड्यात शेतकरी आक्रमक, काटामारीचाही आरोप

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकरी आणि विविध संघटनांची विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी स्मार्ट सिटी कार्यालयात बैठक झाली; परंतु, या बैठकीला कारखानदार उपस्थित नव्हते. या बैठकीत ऊस दरवाढीसंदर्भात तातडीने पावले उचला, ऊस वजन करताना हेराफेरी करणाऱ्या, उसाची रिकव्हरी दाबून ठेवत भाववाढ न देणाऱ्या कारखानदारांवर कारवाई करा, अशा पाऊस शेतकऱ्यांनी विभागीय आयुक्तांसमोर केल्या. धाराशिव जिल्ह्यातील रविराज साबळे यांनी कारखानदार काटामारी करतात, उसाची रिकव्हरी दाबून ठेवतात, असा आरोप करत उसाला ४,२०० रुपये दर द्यावा आणि सर्व कारखान्यांवर धाडी टाकून वजनकाटे तपासावेत, अशा मागण्या केल्या. पश्चिम महाराष्ट्रात उसाला मागणीनुसार दर मिळतो, त्या उसाची साखर बनते आणि आमच्या उसाचे मीठ बनते का?’ असा प्रश्न करत शेतकऱ्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.

मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यांतील ऊस उत्पादक शेतकरी व संघटनांचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. प्रादेशिक साखर सहसंचालकांसह विभागीय सहआयुक्त रिता मेत्रेवार, स्वाभिमानी संघटनेचे ज्ञानेश्वर मुळे यांच्यासमोर शेतकऱ्यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी सांगितले की, प्रादेशिक साखर सहसंचालकांना साखर कारखान्यांकडून उसाच्या काट्यात होत असलेल्या चोरीची भरारी पथकामार्फत तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक शेतकरी त्यांच्या कार्यालयात जाऊ शकणार नाहीत, म्हणून एक नंबर जारी करण्याचेही सांगितले आहे. तक्रारीअंती १०० टक्के कारवाई होणारच. त्याबद्दल शेतकऱ्यांनी निश्चिंत राहावे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here