सातारा : कृष्णा कारखान्याने ओलांडला पाच लाख मे. टन ऊस गाळपाचा टप्पा, बिलही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

सातारा : येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यामध्ये यंदा ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणेच्या काटेकोर नियोजनामुळे कारखान्याकडे नियमित ऊस पुरवठा होत असून, गाळप प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. पहिल्या पंधरवड्यातील उसाला प्रतिमेट्रिक टन ३,९०० रुपयांप्रमाणे होणारे बिल वेळेत संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाल्याने शेतकऱ्यांचा कारखान्यावरील विश्वास अधिकच दृढ झाला आहे. त्यामुळेच कारखान्याने चालू गळीत हंगामात पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा महत्त्वपूर्ण टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला. कारखान्याने आतापर्यंत पाच लाख दोन हजार ३७२ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे.

याबाबत कारखान्याच्या सूत्रांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत कष्टाने पिकवलेला ऊस ‘कृष्णा’ कारखान्याला देण्यास पसंती दिली आहे. सभासदांचा हा विश्वास, ऊसतोडणी-वाहतूक यंत्रणेचे नियोजन आणि प्रशासनाचे परिश्रम या मुळे गळीत हंगाम जोमात सुरू आहे. हंगाम यशस्वी करण्यासाठी कारखाना प्रशासन प्रयत्नशील आहे. कारखान्याने नेहमीच शेतकरी सभासदांचे हित जपत पारदर्शक आणि नियोजनबद्ध कारभाराला प्राधान्य दिले आहे. अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जयवंतराव भोसले यांच्या विचारांचा वारसा कारखान्याची जपत वाटचाल सुरू आहे. योग्य नियोजन व समन्वयामुळे हंगामाच्या सुरुवातीपासूनच गाळप गती कायम राहिली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here