कोल्हापूर : छत्रपती राजाराम कारखान्याचा सहवीज प्रकल्प कार्यान्वित, उसाचा पहिला हप्ता ३,९०० रुपयांप्रमाणे जमा

कोल्हापूर : कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ चा गळीत हंगाम सुरू झाला असून, ४०१४३.४९२ टन उसाचे गाळप झाले. जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात झालेल्या वाटाघाटीनुसार ऊस बिलाची पहिली उचल ३९०० रुपये प्रतिटनाप्रमाणे होणाऱ्या ऊस बिलाची रक्कम १५६५.६० लाख ऊस पुरवठादार शेतकरी सभासदांना त्यांच्या बँकेतील खात्यावर जमा केली आहे. दरम्यान, १८.५ मेगावॅट क्षमतेच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन मार्गदर्शक संचालक महादेवराव महाडिक, अध्यक्ष आमदार अमल महाडिक, उपाध्यक्ष गोविंदा चौगले यांच्यासह संचालक मंडळाच्या उपस्थितीत झाले. या प्रकल्पातून प्रत्यक्ष वीज निर्मिती सुरू झाली असून, अतिरिक्त वीज राज्य विद्युत पारेषण व्यवस्थेला देण्यास प्रारंभ झाला.

यावेळी कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार अमल महाडिक म्हणाले की, कारखान्याच्या आधुनिकीकरणासह ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ऊस गाळप प्रक्रियेतून उपलब्ध होणाऱ्या बगॅसचा इंधन म्हणून वापर करून या प्रकल्पातून वीज निर्मिती केली जाईल. त्यामुळे कारखान्यातील उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर होण्याबरोबरच अतिरिक्त ऊर्जानिर्मिती शक्य होईल. कमी कालावधीत १८.५ मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प पूर्ण केला आहे. सभासद शेतकऱ्यांनी नोंदविलेला सर्व ऊस गळितास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here