महिंद्राकडून ‘ॲग्रोव्हिजन २०२६’ मध्ये इथेनॉल फ्लेक्स-फ्युएल ट्रॅक्टरचे प्रथमच सार्वजनिक प्रदर्शन

नागपूर: महिंद्रा ट्रॅक्टर्सने नागपूर येथे आयोजित ॲग्रोव्हिजन २०२६ प्रदर्शनात प्रथमच आपल्या इथेनॉल फ्लेक्स-फ्युएल ट्रॅक्टरचे सार्वजनिक प्रदर्शन केले आहे. हे प्रदर्शन २७ ते ३० नोव्हेंबरदरम्यान आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती ‘ईटी ऑटो’ने दिली आहे. महिंद्राचा हा ट्रॅक्टर ४९ एचपी क्षमतेच्या ‘युवो टेक+’ प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. या ट्रॅक्टरमध्ये इथेनॉल-पेट्रोल मिश्रणावर चालण्याची क्षमता आहे. ऊस, मका, मक्याचे ताट, पिकांचे अवशेष आणि कृषी कचरा यांसारख्या कच्च्या मालापासून तयार केलेल्या इथेनॉलचा वापर या ट्रॅक्टरमध्ये करता येणार आहे.

महिंद्राच्या म्हणण्यानुसार, या तंत्रज्ञानामुळे ट्रॅक्टरची कार्यक्षमता कायम राखत कार्बन डायऑक्साइडचे (CO₂) उत्सर्जन कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. या ट्रॅक्टरची कामगिरी तुलनात्मक डिझेल ट्रॅक्टरइतकीच राहील, असा कंपनीचा दावा आहे.महिंद्रा ट्रॅक्टर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्ष राय यांनी प्रदर्शनादरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना या ट्रॅक्टरची कार्यपद्धती दाखवून दिली.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here