अहिल्यानगर : कर्मवीर काळे कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन, १५ ऑक्टोबरपासून हंगाम

अहिल्यानगर : सरकारने केलेल्या सूचनांनुसार कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने येत्या पंधरा ऑक्टोबर रोजी गळीत सुरू करण्याची तयारी पूर्ण केली. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून हा हंगाम यशस्वी करायचा आहे. त्यासाठी कारखाना सज्ज होत आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी केले. कारखान्याच्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ माजी आमदार अशोक काळे यांच्या उपस्थितीत व दिनार कुदळे व त्यांच्या पत्नी प्रिया कुदळे यांच्या हस्ते संपन्न झाला. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

आमदार काळे म्हणाले की, परिस्थिती अनुकूल नसली, तरी गळीत हंगाम सुरू करणे अनिवार्य आहे. सर्व बाजूंनी अडचणी आहेत. त्यावर मात करून पुढे जाण्याचे आव्हान आहे. सर्वच कारखान्यांसमोर या अडचणी आहेत. सरकारी सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची आपली परंपरा आहे. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गळीत हंगाम आव्हानात्मक आहे. पाऊस कमी, हिवाळा कमी त्यामुळे साखर उतारा व वजन दोन्ही कमी राहील. काही ऊस वैरणीसाठी जाईल आणि लागवड देखील घटेल, तरीही हंगाम यशस्वी करू असा विश्वास मला वाटतो. कारखान्याचे संचालक सूर्यभान कोळपे, सुधाकर रोहोम, दिलीपराव बोरनारे, डॉ. मच्छिंद्र बर्डे, शंकरराव चव्हाण, प्रवीण शिंदे, राजेंद्र घुमरे, सचिन चांदगुडे, श्रीराम राजेभोसले, राहुल रोहमारे, जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद आदी उपस्थित होते. सुनील कोल्हे यांनी प्रास्ताविक केले. संदीप शिरसाठ यांनी सूत्रसंचालन केले. संचालक सूर्यभान कोळपे यांनी आभार मानले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here