अहिल्यानगर : ऊसतोडणी मजुरांच्या आरोग्यासाठी देवनाथ फाऊंडेशनचे कार्य व्यापक करणार – डॉ. ज्ञानेश्वर दराडे

अहिल्यानगर : अहिल्यानगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालनासह मराठवाड्यातील मोठ्या संख्येने ऊसतोड मजूर सहा महिने घरदार सोडून स्थलांतर करतात. या काळात त्यांना राहण्याची अपुरी व्यवस्था, महिलांसाठी स्वच्छतेच्या सुविधांचा अभाव, लहान मुलांसाठी वसतिगृहांची कमतरता, ऊस वाहतुकीदरम्यान होणारे अपघात, तातडीच्या आरोग्यसेवेचा अभाव अशा गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. याबाबत देवनाथ फाऊंडेशनतर्फे आरोग्य संरक्षण अभियान चालवले जाते. त्यांच्या आरोग्य विषयक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न सुरू आहेत. या कार्याची दखल घेत फाऊंडेशनचे डॉ. ज्ञानेश्वर दराडे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

याबाबत डॉ. दराडे म्हणाले की, महाराष्ट्रातील उपेक्षित व वंचित कामगारांच्या आरोग्य प्रश्नांवर ठोस उपाययोजना व्हाव्यात, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. देवनाथ फाउंडेशनच्या माध्यमातून भगवानगड परिसरासह राज्यभरातील ऊसतोडणी मजूर व वाहतूक कामगारांच्या आरोग्य संरक्षण, संवर्धन आणि जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. स्थानिक नेते व सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने या विषयावर प्रभावी जनआंदोलन उभारून सक्षम आराखडा तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ऊसतोडणी मजूरांच्या आरोग्यविषयक मागण्यांना निश्चितच न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ऊस तोडणी मजूर व वाहतूक कामगारांच्या आरोग्य विषयक प्रश्नांवर सुरू असलेल्या शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे डॉ. दराडे यांनी सांगितले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here