अहिल्यानगर : राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे शिर्डी येथे ३० जुलैपासून कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर

अहिल्यानगर : शिर्डी येथील हॉटेल साई पालखी निवारा येथे राज्यातील साखर कामगारांसाठी तीन दिवशीय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन गुरूवार दि. ३० जुलै रोजी सकाळी ११ वाजता राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील असणार आहेत.

या शिबिरासाठी माजी मंत्री जयंतराव पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे, आ. मोनिकाताई राजळे, आमदार आशुतोष काळे, सोमेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप, नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे हे प्रमुख उपस्थितीत राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, सरचिटणीस राऊशंकर पाटील, उपाध्यक्ष डी.ए.निमसे अहिल्यानगर मुळा कारखाना राष्ट्रीय साखर कामगार युनियनचे अध्यक्ष अशोकराव पवार यांनी दिली.

ChiniMandi WhatsApp Channel

दि. ३० जुलै गुरुवारी दुपारी दोन वाजता अॅड. ए. पी. चौगुले यांचे नवीन श्रमसंहिता व कामगारांनी घ्यावयाची दक्षता, दुपारी चार वाजता संजय वढावकर यांचे कारखानदारी आणि कामगारांची अवस्था यावर व्याख्यान होणार आहे. शुक्रवार ३१ जुलै रोजी सकाळी अकरा वाजता खा. निलेश लंके, आ. प्राजक्त तनपुरे, आ. विवेक कोल्हे, भोगावती कारखान्याचे चेअरमन प्रा. शिवाजीराव पाटील, साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ प्रमुख यांच्या उपस्थिती राहणार आहे. दुसऱ्या दिवसाच्या सत्रामध्ये मिलिंद रानडे कामगार चळवळ व त्यापुढील आव्हाने, अॅड. संतोष म्हस्के कामगार कायदे व चळवळ, अॅड. दीपक भालेराव नवीन कामगार कायदे या विषयावर व्याख्यान होणार आहे.

शनिवार १ ऑगस्ट रोजी शिबिरार्थी साखर कामगारांचे मनोगत सकाळी नऊ वाजता होईल त्यानंतर अकरा वाजता सांगता समारंभ माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, खा. भाऊसाहेब वाकचौरे, माजी मंत्री शंकरराव गडाख, ज्ञानेश्वरचे चेअरमन नरेंद्र घुले, दत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ कोल्हापूरचे चेअरमन गणपतराव पाटील, छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर इंदापूरचे व्हाईस चेअरमन शिवाजीराव निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या तीन दिवसीय कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व कामगारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here