अहिल्यानगर : राज्यभरातील साखर कामगारांसमोरील वेतन, सेवा अटी, कामगारांचे हक्क, प्रलंबित मागण्या तसेच संघटनात्मक बळकटीकरण या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य साखर कामगार समन्वय समिती शिर्डीमध्ये एकवटणार आहेत. समन्वय समितीची महत्त्वपूर्ण आढावा बैठक आज, १ जुलै रोजी शिर्डीतील साई पालखी निवारा येथे होत आहे. या बैठकीस महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, सरचिटणीस राऊ शंकर पाटील, कार्याध्यक्ष अविनाश आपटे, कोषाध्यक्ष प्रदीप बनगे तसेच महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाचे सरचिटणीस आनंदराव वायकर, कार्याध्यक्ष शिवाजीराव औटी आणि उपाध्यक्ष शिवाजी कोठवळ हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
मुळा कारखाना राष्ट्रीय साखर कामगार युनियनचे अध्यक्ष अशोकराव पवार आणि सरचिटणीस डी. एम. निमसे यांनी दिली. निमसे यांनी सांगितले की, राज्यातील साखर उद्योगातील कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर, आगामी अधिवेशनाच्या तयारीवर आणि संघटनात्मक धोरणांवर चर्चा केली जाईल. राज्य साखर कामगार समन्वय समितीच्या बैठकीत आढावा घेतला जाईल. राज्यातील साखर कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी पुढील दिशा निश्चित करणे, विविध प्रश्नांवर एकमताने भूमिका ठरविणे आणि आगामी अधिवेशनाच्या अनुषंगाने नियोजन करणे हा या बैठकीचा प्रमुख उद्देश आहे.


















