अहिल्यानगर : प्रसाद शुगरमधील चोरीप्रकरणी तिघांना अटक, एक चोरटा अद्याप पसार

अहिल्यानगर : वांबोरी येथील प्रसाद शुगर अॅण्ड अलाईड अॅग्रो प्रॉडक्ट्स लिमिटेड, वांबोरी या साखर कारखान्याच्या स्टोअर विभागात गुरुवारी (ता. ६) चार जण भंगार खरेदीच्या बहाण्याने आले होते. त्यांनी स्टोअर विभागातील कर्मचारी सागर तनपुरे यांनी कपाटात ठेवलेले ५० हजारांचे दोन पितळी बुश आरोपींनी पाळत ठेवून चोरी केले. दोन पितळी बुश चोरी करणाऱ्या चार जणांच्या टोळीचा राहुरी पोलिसांनी पर्दाफाश केला. यापैकी तिघांना अटक करण्यात आली. सोएफ शहा, कैसर शेख आणि मुत्तबिर शहा (सर्व रा. श्रीरामपूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

शुक्रवारी (ता. ७) सकाळी साडेआठ वाजता कामावर आलेल्या तनपुरे यांना त्यांच्या कपाटाचे कुलूप तोडून चोरी झाल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी अवघ्या २४ तासात तीन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरी केलेला सर्व मुद्देमाल हस्तगत केला. एक आरोपी अद्याप फरार आहे. कारखान्याचे कार्यालय अधीक्षक बबन पांगिरे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंदविला. पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल अशोक झिने, संजय राठोड, पोलिस कॉन्स्टेबल सतीश कुऱ्हाडे, प्रमोद ढाकणे, नदीम शेख यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरविली आणि चोरट्यांना अटक केली. फरार चोरट्याचा शोध सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here