नव्या हंगामाआधी उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार सर्व ऊस बिले

गडमुक्तेश्वर : सिंभावली साखर कारखान्यामध्ये ऊस थकबाकीबाबत सुरू राहिलेले भाकियूचे धरणे आंदोलन १५ व्या दिवशी स्थगित झाले. आंदोलनस्थळी पोहोचलेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी कारखान्याच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आश्वासन पत्राच्या आधारे धरणे आंदोलन स्थगित करायला लावले. १५ मार्च पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ३० कोटी रुपये आणि दर महिन्याताल ५० कोटी रुपये देऊन नव्या हंगामाआधी सर्व जुनी थकबाकी दिली जाणार आहे.

सिंभावली साखर कारखान्याने शेतकऱ्यांची ऊस बिले दिली नसल्याने नाराज भाकियूने धरणे आंदोलन केले. आंदोलनाच्या १५ व्या दिवशी मासिक बैठकीच्या अध्यक्षस्थानी महिपाल सिंह चौहान होते. मुन्नवर अली यांनी संचालन केले. जिल्हाध्यक्ष दिनेश खेडा यांनी सांगितले की, संघटनेने नेहमी हक्काची लढाई केली आहे. त्यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी अनुज कुमार यांनी संघटनेचे पदाधिकारी, कारखाना अधिकाऱ्यांची बैठक घेतली. टप्प्याटप्प्याने पैसे दिले जाणार आहेत. उप जिल्हाधिकारी अरविंद द्विवेदी यांनी कारखान्याने दिलेल्या लेखी आश्वासनाची माहिती दिली. यावेळी युवा जिल्हाध्यक्ष जीते चौहान, मुबारक खाँ, महिपाल सिंह चौहान, पी. के. वर्मा, विकार खान, हाजी आरिफ, अनुज चौहान, मंगल सिंह, रमेश चौहान, जुबेर खान आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here