बीड : खेड परिसरात मोठ्या प्रमाणावर काढणीयोग्य तयार असलेला कांदा काढणीला शेतकऱ्यांच्या मदतीला ऊसतोड मजूर आले आहेत. दरवर्षी ऊस तोडणीचा हंगाम संपल्यावर दरवर्षीप्रमाणे निघून जाणारे ऊस तोडणी मजूर यंदा या कामात करत आहेत. संपूर्ण कुटुंबासह हे मजूर उन्हातान्हात राबत कांदा काढणी करत आहेत. त्यांच्या या श्रमामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचतोय, खर्च कमी होतोय आणि हंगाम वाचण्याची आशा निर्माण झाली आहे. कांदा काढणीसाठी ऊस तोडणी मजुरांना सध्या एकरी १२ ते १६ हजार रुपये दर मिळत आहे. या कामामुळे मजुरांनाही रोजगाराची संधी मिळाली आहे.
सध्या या परिसरात सुमारे पाच ऊसतोड मजुरांच्या टोळ्या वास्तव्यास असून, तब्बल २५० लहान- मजूर कांदा काढणीच्या कामात मोठे गुंतले आहेत. या कामातून त्यांच्या कुटुंबांची उपजीविका सुरू असून, शेतकऱ्यांनाही मोठा आधार मिळत आहे. यातून रोजगार मिळतो, कुटुंब चालते आणि शेतकऱ्यांनाही मदत होते. सध्या बीड, लातूरसह मराठवाड्यातील या मजुरांनी खेड परिसर सोडला नाही; उलट संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी तेच आधारवड ठरले. या मजुरांच्या कष्टामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे, असे टोळी मालक शरद पगारीया यांनी सांगितले.


















