बीड : लोकनेते सुंदरराव सोळंके कारखान्याकडून जखमी कर्मचाऱ्यास पाच लाखांची मदत

बीड : माजलगाव येथील लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्यात दीड महिन्यांपूर्वी लागलेल्या आगीत कासारी (ता. धारूर) येथील कर्मचारी बालासाहेब बारीक चोपडे गंभीर भाजले होते. आग विझवताना त्यांना ही दुखापत झाली होती.

चोपडे यांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज ओळखून कारखाना प्रशासनाने त्यांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. त्यानुसार ज्येष्ठ संचालक आमदार प्रकाश सोळंके यांच्या हस्ते पाच लाख रुपयांचा धनादेश चोपडे यांच्या पत्नी व परिवाराकडे सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. सी. बडगुजर आणि ऊसतोड संघटनेचे कृष्णा तिडके उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here